आयबीएन लोकमतमुळे औरंगाबादमधल्या मजुरांना न्याय

October 25, 2008 8:42 AM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर, औरंगाबाद – उत्तरभारतीय मजुरांची पिळवणूक आणि बालकामगारांच्या शोकांतिकेची बातमी आयबीएन लोकमतवर येताच, औरंगाबादचं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. या विषयीचा चौकशी अहवाल सहाय्यक कामगार आयुक्त जी .जे. दाभाडे यांनी मागवला आहे. 24 ऑक्टोबर 2008 रोजी आयबीएन लोकमतवर उपासमार, दारिद्र्य आणि पिळवणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या बिहार, उत्तरप्रदेशाहून महाराष्ट्रात येणा-या मजुरांच्या शोषणाची कैफियत मांडली होती. त्याआधारावर सहाय्यक कामगार आयुक्त जी .जे. दाभाडे यांनी ाापूरजी पालनजीच्या वाळूंज इथल्या साईटवर धाड टाकली. धाड टाकली त्यावेळी लंच टाइम चालू होता. त्यामुळे त्या पाहणीत प्रशासनाला मात्र बालकामगार दिसलेच नाहीत. आता पुन्हा तपासणी करून , बालकामगार आढळले, तर कठोर कारवाई करू, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान याविषयी तातडीनं अहवाल मागवण्यात आला आहे. ‘ही बातमी कळताच आम्ही पाहणी केली. मात्र त्यात बालकामगार सापडले नाहीत. पण सापडले तर कारवाई करू,' असं सहाय्यक कामगार आयुक्त म्हणाले.

close