गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर डांबर गोळे

August 30, 2010 2:44 PM0 commentsViews: 19

30 ऑगस्ट

मुंबईजवळ समुद्रात तेलगळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यात समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात डांबर गोळे आढळून आले आहेत.

गोव्याच्या सर्व समुद्र किनार्‍यांवर असे डांबर गोळे दिसत आहेत.

दरम्यान, गोव्यातील सर्व समुद्र किनारे सकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

close