जळगाव काँग्रेसमध्ये गटबाजी

August 30, 2010 2:51 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

जळगाव काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच काँग्रेसच्या असंतुष्ट गटाने घेतलेल्या बैठकीत माजी अध्यक्ष पारुताई वाघ यांना जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केले.

विशेष म्हणजे या दोन्ही बैठका काँग्रेस भवनातील एकाच सभागृहात झाल्या. अर्ज स्वीकारण्याच्या वेळेत उदयसिंह पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक विद्या डेडू यांनी जाहीर केले.

आता पक्षातील गटबाजी रोखण्याची खरी कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे.

close