गोवा किनारपट्टीवर डांबरगोळे कायम

August 31, 2010 11:22 AM0 commentsViews: 22

31 ऑगस्ट

गोव्याच्या किनारपट्टीवर डांबर मिश्रीत तेलाचा तवंग अजूनही येत आहे.

कोलवाड, वेलकाम, बेतालबादे या बीचेसवर मोठ्या प्रमाणात तेल पसरले आहे. किनारपट्टीच्या सफाईचे काम गोवा पर्यटन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.मात्र साठलेल्या डांबराचे ढीग करून त्याच ठिकाणी फक्त छोट्याशा खड्‌ड्यात टाकले जात आहेत.

गोवा प्रशासनाकडून हे तेल आणि डांबर नेमके कशामुळे येत आहे, याबाबत अद्यापही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

काल या किनार्‍यावर डांबर गोळे आढळले होते. त्यानंतर किनार्‍यांवर काळपट थर जमा झाला आहे. दरम्यान समुद्र किनार्‍यावरील तेल तवंग धोकादायक नाही, असं स्पष्टीकरण गोवा समुद्रविज्ञान संस्थेनं दिलं आहे.

close