अमिताभला चिंता मेट्रोची

August 31, 2010 2:59 PM0 commentsViews: 3

31 ऑगस्ट

बिग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग हा अमिताभ यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यावरुन जाणार आहे. त्यामुळेच अमिताभ चिंतेत पडले आहेत.

आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी ही चिंता मांडली आहे. एका बाजूला या प्रकल्पामुळे नोकरदार वर्गाला तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फायदा होणार असल्याचे अमितजींनी सांगितले. पण दुसरीकडे हा मार्ग प्रतिक्षावरुन जात असल्याने लवकरच आपली प्रायव्हसी नाहीशी होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवाय या प्रकल्पाचे अधिकारी नुकतेच प्रतिक्षा बंगल्यावर येऊन संबंधित पाहणी करुन गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आबांचा सल्ला

दरम्यान स्वत:पुरता विचार न करता इतरांची सोय होणार असेल तर असा त्याग करावाच लागतो, या शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अमिताभ यांना सल्ला दिला आहे.

close