मॅच फिक्सिंगप्रकरणी आणखी तिघे अटकेत

August 31, 2010 5:14 PM0 commentsViews: 1

31 ऑगस्ट

मॅच फिक्सिंगप्रकरणी आणखी तीन जणांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. पण नंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. त्यांची नावे अजून उघड केलेली नाहीत.

दरम्यान इंग्लंडमधील स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सलमान बट्ट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ या तिघांना उद्या चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या खेळाडूंवर कारवाई करण्यासाठी पाक बोर्डावर दबाव वाढत आहे.

इंग्लंडविरुद्ध वन डे सिरीजसाठी या तिघांना बाहेर ठेवावे, अशी मागणी पाकिस्तानचा वन्डे टीमचा कॅप्टन शाहीद आफ्रिदी याने केली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र ही सिरीज सुरुच ठेवावी, असे आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

लाहोर कोर्टानेही पीसीबीला एक नोटीस बजावली आहे. जर गुन्हे सिद्ध झाले तर दोषी खेळाडूंना खटल्याला सामोरे जावे लागेल, असे कोर्टाने म्हटले आहे. आयसीसी-सुद्धा या सर्व प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

कारवाईचा इशारा

दरम्यान, मॅच फिक्सिंगमध्ये दोषी असणार्‍या खेळाडूंवर कडक कारवाईचा इशारा पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी दिला आहे. पण पाकिस्तानातील खेळाडूंविरोधात हा कटही असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पण स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखवलेल्या खेळाडूंवर काय कारवाई करायची, याचा निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही.

close