पुतळ्याच्या दुर्दशेची दखल

September 1, 2010 10:43 AM0 commentsViews: 4

1 सप्टेंबर

गेट वे ऑफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाल्याची बातमी 'आयबीएन-लोकमत'ने काल दाखवली होती. त्यानंतर आज महापालिकेच्या असिस्टंट कमिशनरनी पुतळ्याची पाहणी केली.

मुंबई महापालिकेचे असिस्टंट कमिशनर सुनील धामणे यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली. आणि संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, महापालिकेचे नगर अभियंता लक्ष्मण व्हटकर या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. तर, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर याचा पाठपुरावा करणार आहेत. आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनीही शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्दशा झाली होती. पण महापालिका किंवा राज्य सरकार यापैकी कुणीही पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला नव्हता.

गेल्या दीड वर्षांपासून महापालिका आणि सरकार यांच्यात यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू होता. पण प्रत्यक्ष कृती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नव्हता. अखेर, 'आयबीएन-लोकमत'ने ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याची दखल घेतली. आणि पुतळ्याच्या दुरुस्तीचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.

तसेच, यासंदर्भात आज महापालिका आणि राज्य सरकारच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठकही झाली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर महापालिका प्रशासन जागे झाले आहे.

close