मरीन ड्राईव्हवर अपघातात एक ठार

September 1, 2010 11:15 AM0 commentsViews: 2

1 सप्टेंबर

मरिन ड्राईव्हवर रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

सुशील कोठारी असे गाडी चालवणार्‍याचे नाव आहे. तो दारु पिऊन गाडी चालवत होता. सुशील हा कोठारी बिल्डर्सचा मुलगा असल्याचे समजते. त्याने पहिल्यांदा चर्चगेटजवळ उभ्या असलेल्या टॅक्सीला धडक मारली.

पुढे मरीन ड्राईव्हला बाईकवर जाणार्‍या दोघांना उडवले. त्यात जमीर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पुढे सुशील कोठारीने आपल्या गाडीचा वेग कायम ठेवत मलबार हील रोडवर पार्क असलेल्या दोन गाड्यांना धडक दिली.

पोलीस गाडीच्या मागावर होते. मलबार हीलला नाकाबंदी करण्यात आली होती. तिथेच त्याला पकडण्यात आले.

close