ठाण्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश

September 1, 2010 11:24 AM0 commentsViews: 77

1 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यातील 8 लाख अनधिकृत बांधकामे येत्या 31 डिसेंबरपूर्वी जमीनदोस्त करण्याचे आदेश हाय कोर्टाने दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 3 लाख बांधकामे सरकारी जमिनींवर आहेत. तर पाच लाख बांधकामे खाजगी जमिनींवर आहेत.

येत्या एक ऑक्टोबरपासून ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे उपायुक्तांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात…

ठाणे शहर – 2 लाख 30 हजार

नवी मुंबई – 60 हजार

मीरा-भाईंदर – 11 हजार 569

भिवंडी – 7 हजार 299

कल्याण-डोंबिवली – 73 हजार 658

वसई-विरार – 1 लाख 90 हजार 719

अंबरनाथ – 251

बदलापूर – 4 हजार 882

एमआयडीसी – 59 हजार

जिल्हाधिकारी कार्यक्षेत्र – 19 हजार 600

या ठिकाणची बरीचशी जमीन ही वनखाते, एमआयडीसी, सरकारी जमीन, महापालिका हद्दीतील आणि खासगी आहे.

close