शिवसेनेची जकातीबाबत दुटप्पी भूमिका

September 1, 2010 12:04 PM0 commentsViews: 2

दीप्ती राऊत, नाशिक

1 सप्टेंबर

उद्योजक आणि व्यापार्‍यांचा विरोध असताना, शिवसेनेने नाशिकमध्ये जकातीचे खाजगीकरण रेटून नेले होते. आता ठेकेदारांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनातही सेनेचेच नेते सहभागी झाले आहेत.

सभागृहात ठेका मंजूर करायचा आणि सभागृहाबाहेर ठेका रद्द करण्याची मागणी करायची, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका नाशिकमध्ये दिसत आहे.

नाशिकमधील सर्व उद्योजकांना आणि व्यापार्‍यांना दुसर्‍यांदा रस्त्यावर उतरावे लागले. काही महिन्यांपूर्वी जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी उद्योजकांना आंदोलन करावे लागले होते.

तरीही सत्ताधारी शिवसेनेने विरोध न जुमानता, जकातीचे खाजगीकरण केले. आता त्या खाजगीकरणाचे दुष्परिणाम ठेकेदाराच्या मनमानीतून पुढे येत आहेत.

शहरातील सर्व उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी महापालिकेवर मोर्चा आणला. जकातीसाठी मनमानी करणार्‍या महापालिकेवर चिल्लरफेक केली.

विशेष म्हणजे स्थायी समितीत जकातीच्या ठेक्याला संमती देणारे सर्व राजकीय पक्ष यात सहभागी झाले होते.उद्योजकांनी मात्र, आजपासून संपूर्ण जकातबंदी करून महापालिकेशी असहकार आंदोलन पुकारले.

close