इराकमधील अमेरिकेची लष्करी मोहीम संपली

September 1, 2010 12:15 PM0 commentsViews: 1

1 सप्टेंबर

इराकमधील आपली मोहीम संपल्याचे अमेरिकेने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

अमेरिकेच्या इराकमधील सैन्याची संख्या आता 50 हजारांवर आणण्यात येईल. पण हा अमेरिकेचा विजय नसून अजूनही बर्‍याच गोष्टी करणे बाकी असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे हजारो सैनिक आता युद्धभूमीतून परत येणार आहेत. तर 6 ब्रिगेड्स मागे थांबतील. ऑपरेशन न्यू डॉनमधील युद्ध आणि प्रत्यक्ष लढाईखेरीजची इतर कामे या 6 तुकड्या करतील.

या तुकड्या इराकी पोलीस आणि सैन्याला कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रशिक्षण देतील. आणि पुढच्या वर्षअखेरपर्यंत संपूर्ण अमेरिकन सैन्य माघारी येईल.

close