बिहारमध्ये चार पोलिसांचे अपहरण

September 1, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

1 सप्टेंबर

बिहारमध्ये चार पोलिसांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. त्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली होती.

ती मुदत आता संपली आहे. आता त्या पोलिसांचे कुटुंबीय राज्य सरकारला त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहेत. पण अजूनही सरकारकडून काहीही हालचाली झाल्याचे दिसत नाही.

दरम्यान, ही सगळी जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे सांगून चिदंबरम् यांनी चेंडू नितीशकुमार यांच्या कोर्टात टाकला आहे. या पोलिसांना नक्षलवाद्यांनी रविवारपासून ओलीस ठेवले आहे.

close