फिक्सिंगमध्ये आयसीसीचा हस्तक्षेप

September 1, 2010 1:58 PM0 commentsViews: 5

1 सप्टेंबर

लंडनला झालेल्या स्पॉट फिक्सिंग स्कॅडलमध्ये आता आयसीसीने हस्तक्षेप केला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी हरून लोर्गाट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन इजाज बट्ट यांची भेट घेणार आहेत.

या सगळ्या प्रकारात आयसीसी नेमकी काय कारवाई करणार आहे, हे लोगार्ड यांनी सांगितले नसले तरी क्रिकेटमध्ये अशाप्रकारची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असे लोगार्ड यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच काही खेळाडूंच्या चुकीमुळे संपूर्ण टीमला याचा फटका बसता कामा नये, असेही लोगार्ड यांनी सांगितले.

पाक टेस्ट कॅप्टन सलमान बट्ट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ या तिघांनाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंतरिम चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

close