आता बॉक्सिंगचेही आयपीएल…

September 1, 2010 3:10 PM0 commentsViews: 2

1 सप्टेंबर

इंडियन प्रिमीअर लीगने क्रिकेटेंमेंटची कल्पना रुजवली. टी-20 क्रिकेटची धूम आणि जोडीला चीअर्स गर्ल्सचा तडका यामुळे आयपीएलला अल्पावधीच जबरदस्त लोकप्रियता लाभली.

हीच संकल्पना आता बॉक्सिंग या खेळातही दिसणार आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान लगान कप खेळवला जाणार आहे.

याची माहिती आज मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आला. या सीरिजमध्ये बॉक्सिंगबरोबरच एंटरटेंमेंटचाही समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड आणि भारताचे प्रत्येकी चार बॉक्सर या स्पर्धेत सहभागी होणार असून या मैत्रीपूर्ण मॅचेस असतील.

close