पुण्यात साठीतील तरुणांची दहीहंडी

September 1, 2010 5:03 PM0 commentsViews: 12

1 सप्टेंबर

एकीकडे दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज झाली असताना पुण्यातील 'तरुणांनीही' मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सराव केला. आणि हे तरुण गोविंदा होते, चक्क साठीच्या वरचे.

आजच्या दहींहडीला आलेले व्यावसायिक स्वरुप आणि त्यामुळे लोप पावत चाललेली दहीकाल्याची खरी संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे हे लोक सांगतात.

गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व गोविंदा मानवी थर तयार करण्याचा सराव करत आहेत.

close