दहीहंडी खेळूया चला…

September 2, 2010 9:44 AM0 commentsViews: 119

2 सप्टेंबर

मुंबई आणि राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष आहे. दहीहंडी खेळूया चला…अशी एकमेकाला साद घालत गल्लोगल्लीचे गोविंदा उंचच उंच मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी निघाले आहेत.

पुरुष गोविंदा पथकांसोबतच महिला गोविंदाही सज्ज आहेत. नवे रेकॉर्ड, नवी उंची गाठण्यासाठी गोविंदा उत्सुक आहेत. तर तो सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईकरही घराच्या बाहेर पडले आहेत.

गेल्या वर्षी संस्कृती गोविंदा उत्सवात, नऊ थरांचा रेकॉर्ड करण्यात आला होता. हा रेकॉर्ड तुटणार का, याची उत्सुकता आहे…

close