अध्यक्षपदासाठी सोनिया चौथ्यांदा उमेदवार

September 2, 2010 12:19 PM0 commentsViews: 1

2 सप्टेंबर

सलग चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येण्याचा रेकॉर्ड करण्यासाठी सोनिया गांधी सज्ज झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आज अर्ज दाखल केला आहे.

सोनियांसाठी 55 जणांनी नॉमिनेशन दाखल केले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिक घोषणा उद्या होणार आहे. सोनिया गांधींनी 1998 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेस दोन वेळा सत्तेत आली. काँग्रेसच्या 125 वर्षांच्या काळात सर्वात जास्त काळ अध्यक्षपदावर राहण्याचा मान सोनिया गांधींना मिळाला आहे.

close