एअरपोर्टसाठी मुख्यमंत्री भेटणार पंतप्रधानांना

September 2, 2010 12:24 PM0 commentsViews: 1

2 सप्टेंबर

नवी मुंबई एअरपोर्टच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी सकाळी 10 पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत.

त्यांच्यासोबत महसूलमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम आणि कृपाशंकर सिंग असतील.

सध्या नवी मुंबई एअरपोर्टचा मुद्दा केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयात प्रलंबित आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, पर्यावरण मंत्रालयाच्या एका समितीने आज नवी मुंबई एअरपोर्टच्या जागेची आज पाहणी केली.

close