मॅचफिक्सिंगवरील कारवाईसाठी दबाव

September 2, 2010 12:40 PM0 commentsViews: 6

2 सप्टेंबर

मॅचफिक्सिंगचा आरोप असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे कारवाईसाठी टाळाटाळ करणार्‍या पाकिस्तानने अखेर नमते घेतले आहे.

सलमान बट्ट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ या दोषी खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या वन-डे आणि T-20 सीरीजमधून काढून टाकण्यात आले आहे. या तिघांना आता मायदेशी परत पाठवले जाणार आहे. पण त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही.

वीणाने केली कागदपत्रे सादर

दरम्यान मोहम्मद आसिफची माजी गर्लफ्रेंड वीणा मलिक हिने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे काही कागदपत्रे सादर केली आहेत. आसिफचे भारतीय बुकींशी संबंध असल्याचे हे पुरावे आहेत.

आसिफचे बुकींशी झालेल्या संभाषणाचे व्हॉईस रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे यात आहेत.

close