एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून

September 3, 2010 9:39 AM0 commentsViews: 4

3 सप्टेंबर

पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न एकाने केला आहे. ही तरुणी पिंपरीच्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये शिकत होती.

जोत्स्ना बागूल असे या तरुणीचे नाव आहे. योगेश बच्छाव असे तिचा खून करणार्‍या तरुणाचे नाव आहे. जोत्स्नाने लग्नाला नकार दिल्याचा राग आल्यामुळे योगेशने हे कृत्य केले.

त्याने आज चाकूने जोत्स्नावर वार केले. आणि नंतर स्वतःवरही वार करून घेतले. हे दोघेही नात्यातीलच आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या बच्छाववर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

close