लवासाची चौकशी होणार

September 3, 2010 9:57 AM0 commentsViews:

3 सप्टेंबर

पुणे जिल्ह्यातील लवासा हिल सिटीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा गौप्यस्फोट आज महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला.

या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण समिती स्थापन केली आहे. तिचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत येईल, अशी घोषणा करून नारायण राणेंनी खळबळ निर्माण केली आहे.

जलसंपदा विभागाला, खाजगी कंपनीला जमीन विकण्याचा अधिकार आहे का, तसेच आदिवासींकडून जमीन घेताना नियमांचे पालन करण्यात आले का, आणि शेतकर्‍यांकडून जमीन घेताना जबरदस्ती करण्यात आली का, याबद्दल चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सरकारच्या या निर्णयाचे पुण्यातील जनआंदोलन समन्वय संघटनेने स्वागत केले आहे. पण या चौकशीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

close