फिक्सिंग प्रकरणी तिघे निलंबित

September 3, 2010 11:09 AM0 commentsViews: 3

3 सप्टेंबर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने तिन्ही प्लेअर्सना निलंबित केले आहे. पण पाकिस्तानचे अधिकारी मात्र अजूनही हे मान्य करायला तयार तयार नाहीत.

निलंबनाचा आयसीसीचा निर्णय चुकीचा असून यावर पीसीबी कायदेशीर पावले उचलणार असल्याचे समजते. आणि आयसीसीकडे सादर केलेले पुरावे हे बनावटी असू शकतात, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टी-2 मॅच 5 सप्टेंबरला होणार असून टीम व्यवस्थापनला आता 13 खेळाडूंमधूनच अंतिम 11 जणांची निवड करावी लागणार आहे.

या तिघांऐवजी दुसर्‍या तीन खेळाडूंची निवड लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करण्याची शक्यता आहे.

close