फी वाढीसंदर्भात कायद्याचा विचार

September 3, 2010 11:45 AM0 commentsViews: 1

3 सप्टेंबर

फी वाढीसंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन गरज भासल्यास सरकार कायदा करण्याचा विचार करेल, अशी माहिती शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. खाजगी शाळांच्या मनमानी फी वाढीला आळा घालण्यासाठी सरकारने काढलेला 15 जुलैचा जीआर हायकोर्टाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे आता खासगी शाळांच्या फीवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा जीआर अभ्यास करुनच काढला होता. पण त्यात काही त्रुटी राहिल्या आहेत का, याचासुद्धा विचार करू, असे थोरात यांनी सांगितले. तसेच मराठी शाळांच्या प्रस्तावांसंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

त्यानंतर आवश्यकतेनुसार मराठी शाळांना परवानगी दिली जाईल, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

close