पुणे विद्यापीठात नेट, सेटग्रस्तांचा मोर्चा

September 3, 2010 1:44 PM0 commentsViews: 2

3 सप्टेंबर

नेटसेट झाल्यानंतर प्राध्यापकपदासाठी अर्ज करुनही अनेकांना नोकरी मिळत नाही. नोकरी मागायला गेल्यावर पैशांची मागणी केली जाते, वशिलेबाजी केली जाते. याचा निषेध करण्यासाठी पुणे विद्यापीठात आज विद्यार्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला.

पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीपासून निघालेला हा मोर्चा कुलगुरु कार्यालयाकडे गेला. कुलगुरुंना निवेदन देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला.

मात्र हा विषय माझ्या अखत्यारीतील नसल्याचे सांगत कुलगुरुंनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील यूजीसी कार्यालयासमोर निदर्शने केली.

close