नाशिकमध्ये विहिंपच्या ऑफिसवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

October 25, 2008 11:54 AM0 commentsViews: 5

25 ऑक्टोबर, नाशिकनाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या ऑफिसवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. शहरातील अशोक स्तंभ परिसरात ही घटना घडली. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदुत्ववादी संघटनांची नावं पुढे येत असताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे.अशोक स्तंभ परिसरातल्या इमारतीत विश्व हिंदू परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांची ऑफिसं एकत्रच आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ऑफिसमधील कार्यकर्त्यांच्या तोंडाला काळं फासलं. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे 30 ते 40 कार्यकर्ते कार्यालयात शिरुन त्यांनी गोंधळ घालत सामानांची मोडतोड केली. कार्यालयातील खंडेराव गरुड या विद्यार्थ्याच्या तोंडाला कार्यकर्यांनी काळं फासलं.' पक्षाच्या ध्येय धोरणात हे बसत नाही. कार्यकर्त्यांवर गृहखातं कारवाई करेल तरीही कार्यकर्त्यांना संयम बाळगावा, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी ' आयबीएन लोकमत ' शी बोलताना सांगितलं.

close