ऊस हप्त्यासाठी बारामतीत आंदोलन

September 3, 2010 1:56 PM0 commentsViews: 4

3 सप्टेंबर

उसाला 2200 रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. बारामतीत या आंदोलनाला सुरुवात झाली.

सोमेश्वर कारखान्यावर शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर साखरेला प्रतिक्विंटल 3 हजार रुपये भाव मिळावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

भाव कमी मिळाला, तर कारखान्यातून साखरच बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर कृषीमंत्री शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

close