आयबीएन लोकमतने जगासमोर आणला गिलख्रिस्टचा खोटारडेपणा

October 25, 2008 1:30 PM0 commentsViews: 16

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टनं खोटारडेपणाचा आरोप केला. आणि मिडियानंही सचिन खोटारडा असल्याच्या थाटात ब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली. पण अचूक बातमी ठाम मत हे घोषवाक्य असलेल्या आयबीएन लोकमतनं सगळ्यात पहिल्यांदा सत्य जगासमोर आणलं.अ‍ॅडम गिलख्रिस्टनं स्वत:हून सचिनशी मोबाईलवर संपर्क साधला आणि आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचं सचिनला सांगितलं. गिलख्रिस्टचा हा माफीनामा सगळ्यात आधी आयबीएन लोकमतनं जगासमोर आणला. त्यानंतर अवघ्या जगानं त्याची दखल घेतली. देशभरातील अनेक इंग्लिश वर्तमानपत्रांनी आणि क्रिक इन्फोसारख्या प्रसिध्द वेबसाईटनंही आयबीएन लोकमतचा हवाला देऊन ही बातमी ब्रेक केली.

close