अमरावतीत साथीच्या आजारात 5 जणांचा मृत्यू

September 3, 2010 3:11 PM0 commentsViews: 5

3 सप्टेंबर

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजारात गुरूवारी एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला.

तर आठवडाभरात मृत्यू पावलेल्यांची संख्या 13 वर गेली आहे. वरूड तालुक्यात साथ पसरली असताना सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. त्याचा रूग्णांना फटका बसलाय.

वेळेवर औषध न मिळाल्यामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान या विषाणूजन्य तापाचे नमुने पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पण अचूक निदान करण्यात प्रयोगशाळेला अजूनही यश आलेले नाही.

close