साध्वी प्रज्ञासिंग ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये

September 3, 2010 3:18 PM0 commentsViews: 2

3 सप्टेंबर

मालेगाव बॉम्बस्फोटातली प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंग हिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. साध्वीला नाशिकच्या जेलमधून मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात येत होते.

प्रवासात इगतपुरीजवळ साध्वीला अतिसाराचा त्रास जाणवू लागला. तसेच तिच्या छातीतही दुखू लागल्याने तिला शहापूरच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार केल्यानंतर तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

प्रवासादरम्यान पोलिसांनी साध्वीची योग्य काळजी न घेतल्याचा आरोप तिच्या निकटवर्तीयांनी केला आहे.

close