तरी दुरावा नाही…

September 4, 2010 10:01 AM0 commentsViews: 3

4 सप्टेंबर

लवासा प्रकरणी जरी चौकशीचे आदेश दिले असले तरीही सत्ताधार्‍यांमध्ये दरी निर्माण होणार नाही, असा दावा महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

काल चौकशीचे आदेश देणार्‍या राणेंनी आज जरा सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

लवासा प्रकल्पात काही जमिनी आदिवासींकडून बळजबरीने घेतल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे मी महसूल मंत्री म्हणून चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठीचा असेल तर त्याचे स्वागतच आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राणे नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली.

close