जोत्स्ना बागुल खून प्रकरणी पोलिसांकडून चूक

September 4, 2010 11:17 AM0 commentsViews: 5

4 सप्टेंबर

जोत्स्ना बागुल खून प्रकरणी पोलीसांकडून चूक झाल्याची कबुली पुण्याच्या आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिली आहे.

पिंपरीच्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये जोत्स्नाचा काल खून झाला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला होता. तसेच हल्ला करणार्‍या तरुणाने नंतर स्वत: वरही वार केले होते.

या घटनेआधीच जोत्स्नाने दोन वेळा पोलिसांत तक्रार केली होती. पण पोलिसांकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले, असे मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.

तर या प्रकरणात हेड कॉन्सटेबल संजय सरकाळे यांच्यावर निलंबनाची, आणि पोलीस इन्सेपक्टर विश्वस जाचक आणि असिस्टंट पोलिस इन्सपेक्टर राजेंद्र सावंत यांची संवेदनशीलता न राखल्याप्रकरणी बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

close