अमरावती इथल्या राज्य महिला कुस्ती स्पर्धात पुणे संघानं पटकावलं अजिंक्यपद

October 25, 2008 1:52 PM0 commentsViews: 66

अमरावती येथे हनुमान व्यायाम मंडळात दहावी वरिष्ठ महिला राज्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यात पुणे संघानं सर्वाधिक गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं तर रायगडचा संघ उपविजेता ठरला.सात प्रकारच्या वजनी गटात झालेल्या या कुस्ती स्पर्धेत एकूण 15 जिल्ह्यातील जवळ जवळ 200 खेळाडू सामील झाले होते. ही स्पर्धा घेण्यात आली ती महिला कुस्तीपटूमध्ये या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये पुणे संघानं सर्वाधिक पाच सुवर्ण पदकं पटकावली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत रायगड संघानं दुसरं स्थान पटकावलं. या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.

close