कोल्हापुरात फिल्म फेस्टिव्हल

September 4, 2010 2:31 PM0 commentsViews: 2

4 सप्टेंबर

कोल्हापुरात किर्लोस्कर वसुधंरा इंटनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरुवात झाली आहे. शाहु स्मारक भवन इथे 5 सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेल्या या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन नुकतेच झाले.

या फिल्म फेस्टीव्हलमधून पर्यावरण, वन्य जीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी यांच्याशी मानवाचे असणारे नाते आणि त्याचे संवर्धन आणि संगोपनाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

यावेळी प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर आणि विज्ञान प्रबोधनी या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या महोत्सवाची सुरुवात शेखर दत्तारी दिग्दर्शित 'ट्रुथ अबाऊट टायगर' या पुरस्कारप्राप्त सिनेमाने करण्यात आली.

close