जखमी गोविंदासाठी मनसेची मदत

September 4, 2010 2:38 PM0 commentsViews: 2

4 सप्टेंबर

मुंबईत दहिहांडीत मानवी थर लावताना जखमी झालेल्या गोविदांची संख्या यंदा वाढली आहे. कुर्ल्यामध्ये दहीहंडी फोडताना जखमी झालेला दत्तात्रय सांळुखे याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. दत्तात्रयला वाचवण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण अजूनही त्याची प्रकृती जैसे थे आहे.

दरम्यान दत्तात्रय साळुंखे यांच्या मदतीसाठी आता मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वच जखमी गोविंदांची भेट घेतली.

यावेळी मनसेचे चेंबूर विभागाचे अध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांनी दत्तात्रयच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केली. महापालिका दत्तात्रयच्या उपचारांचा खर्च करत आहे.

तर मनसेने आता त्याच्या कुटुंबीयांचा खर्च उचलला आहे. यापुढेही त्यांना मदत लागली तर आपण करणार असल्याचे दुनबळे यांनी स्पष्ट केले आहे.

close