गिरणी कामगार म्हाडाच्या जाहिरातीविरोधात

September 4, 2010 2:45 PM0 commentsViews: 6

4 सप्टेंबर

गिरणी कामागारांच्या घरांसाठी म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या फसव्या जाहिराती विरोधात गिरणी कामगार एकवटले आहेत.

या जाहिरातीबद्दल जाब विचारण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची भेट घेण्यासाठी हे कामगार आता त्यांच्या घरासमोर जमू लागले आहेत.

घरांसाठीची ही जाहिरात मागे घ्या, आणि गिरणी कामगारांशी चर्चा करून मोफत घरे द्या, या गिरणी कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत.

गिरणी कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी प्रसिद्ध केलेली ही जाहिरात फसवी आहे, असा आरोप या गिरणी कामगारांनी केला आहे.

दरम्यान, भेटीसाठी आलेल्या काही कामगारांना पोलिसांनी अटकही केली आहे. पण नंतर सचिन अहिर आणि कामगार नेत्यांमध्ये आता बैठक सुरू झाली आहे.

close