खडसेंविरोधात ऍट्रासिटी तक्रार

September 4, 2010 2:54 PM0 commentsViews: 1

4 सप्टेंबर

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात एका महिलेने ऍट्रासिटीची तक्रार दाखल केली आहे.

खडसेंचाच मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातील निवडणूक प्रचार सभेतील भाषणात खडसेंनी आपले चारित्र्यहनन केल्याचा या महिलेचा आरोप आहे.

आपण दलित असल्याने खडसेंनी ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचारसभेतील भाषणात चारित्र्यहनन होईल असे दुहेरी अर्थाचे शब्द वापरल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. खडसे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

close