जळगावात पतसंस्थांविरुद्ध कारवाईचा धडाका

September 4, 2010 3:58 PM0 commentsViews: 2

प्रशांत बाग, जळगाव

4 सप्टेंबर

जळगाव जिल्ह्यात पतसंस्थांविरुध्द सहकार खात्याने कारवाईचा धडाका लावला आहे. ऑडिटमध्ये सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर काही पतसंस्थांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोलच्या प्रख्यात दादासाहेब डॉ ना. मो. काबरे नागरी बँक आणि जळगावच्या सिध्दी व्यंकटेश सहकारी बँक या दोन्ही बँकात जवळपास 28 कोटींचा अपहार केल्याचा ठपका 84 जणांवर ठेवण्यात आला आहे.

ठेवीदारांना वेठीस धरणार्‍या एरंडोलच्या दादासाहेब डॉ. ना. मो. काबरे नागरी बँकेचे सर्व संचालक फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. या बँकेच्या ऑडिटमध्ये जवळपास 25 कोटींचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या बँकेच्या 2 शाखांना रिझर्व बँकेची परवानगीच नसल्याची धक्कादायक माहितीही या ऑडिटमध्ये उघड झाली आहे.

या सिध्दी व्यंकटेश बँकेतील अपहार शोधताना ऑडिटरलाही बराच त्रास झाला. नाममात्र शिल्लक असलेल्या बचत खात्यांतून लाखोंची रक्कम विड्रॉल करण्यात आली.

कागदोपत्री सगळ्या नोंदी योग्य असल्याने पैसा गेला कुठे, हे शोधणे अवघड होते.

या अपहाराचे सूत्रधार आहेत, एरंडोलच्या काबरे बँकेचे चेअरमन डॉ. ना. मो. काबरे आणि सिध्दी व्यकटेश बँकेचे संस्थापक चेअरमन उद्योगपती श्रीकांत मणियार. पण ते अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

गुन्हा तर दाखल झाला पण आमचा पैसा कधी मिळणार? या ठेवीदारांच्या प्रश्नांचे उत्तर मात्र आजही कोणाकडेच नाही.

close