बिहारमधील पोलिसांचे अपहरण नाट्य सुरुच

September 4, 2010 4:12 PM0 commentsViews: 1

4 सप्टेंबर

नक्षलवाद्यांनी पोलिसांचे अपहरण केल्याच्या घटनेला आज सहा दिवस उलटून गेले.

दोन दिवसांपूर्वीच एका पोलिसाची हत्या करण्यात आली. आणि नीतीश कुमार आणखी अडचणीत आले. त्यांनी याच विषयावर सार्वमत जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र राज्यातील महत्त्वाचे नेते राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान या बैठकीला उपस्थित नव्हते.

राज्यातील विधिमंडळाच्या नेत्यांना या चर्चेला बोलावल्याचे कारण देत, हे नेते उपस्थित राहिले नाहीत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना हे प्रकरण नक्कीच कठीण जाणार आहे.

आज राहुल गांधी बिहारच्या दौर्‍यावर होते. त्यांनीही यावेळी त्यांनी पोलिसांच्या अपहरणाविषयी दु:ख व्यक्त केले.

close