मनोमिलन दूरच…

September 5, 2010 4:29 PM0 commentsViews: 2

05 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यात मनोमिलन घडवण्याचा प्रयत्न करणार्‍या, सतीश वळंजू यांच्या 'माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' चळवळीला झटका बसला आहे.

मोठ्या अपेक्षेने कृष्णकुंजवर गेलेल्या, वळंजू यांना राज ठाकरे भेटलेच नाहीत. तर, मातोश्रीवर उद्धव ठाकरे मात्र भेटले. पण त्यांनी या उत्साही कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.

आपली शक्ती असल्या आंदोलनात, वाया घालू नका असा सल्लाही त्यांनी या कार्यकर्त्यांना दिला.

आणि मराठी जनता शिवसेनेच्या मागे उभी असल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केले. महत्वाचे म्हणजे घरी आलेल्यांना भेटले पाहिजे उद्धटपणे वागू नये, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना मारला.

close