शिक्षक दिनी शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

September 5, 2010 3:35 PM0 commentsViews: 5

05 सप्टेंबर

नांदेडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सुरु असतांना अशोक गीते या शिक्षकाने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. अशोक भिसे हे दत्तनगरमधल्या महात्मा फुले शाळेत शिक्षक होते.

निलंबीत केलेल्या अशोक भिसेंना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश कोर्टाने दिला होता.

पण, तरीही संस्थेने पुन्हा कामावर रुजू करून न घेतल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही शाळा मुख्यमंत्र्यांच्या सचिवाची आहे.

close