दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

September 5, 2010 4:44 PM0 commentsViews: 3

05 सप्टेंबर

दहीहंडीत जखमी झालेल्या ठाण्यातल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. किशोर कांबळे असं या दुदैर्वी गोविंदाचं नाव आहे.

21 वर्षाचा किशोर ठाण्यातल्या ओम साई मित्र मंडळाचा गोविंदा होता. चौथ्या थरावर असणारा किशोर दहीहंडी फोडताना तीन-चार वेळा पडला होता.

त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर रक्त गोठल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

आमदार प्रताप सरनाईक यांनी लागलीच किशोरच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारली आहे.

close