राहुल यांचा डाव्यांवर हल्लाबोल

September 6, 2010 9:15 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

जगातून कम्युनिझम संपत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधूनही कम्युनिझम संपणार आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केली आहे.

प. बंगालच्या दौर्‍यात ते कोलकाता येथील सभेत बोलत होते. पं. बंगालमध्ये लवकरच निवडणुका होत आहेत. त्यासाठीच काँग्रेसने बंगालमद्ये सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्याचीच सुरुवात राहुल गांधींच्या हस्ते झाली.

उत्तर प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली, आता बंगालमध्ये आम्ही लढणार, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी डाव्यांवर कडाडून टीका केली. केंद्राने पुरवलेला पैसा हे सरकार लोकांपर्यंत पोहोचूच देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

close