केंद्रीय मंत्रिमंडळ होणार तरूण

September 6, 2010 9:34 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल केले जातील, असे संकेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिले आहेत.

आपल्याला मंत्रिमंडळाचे सरासरी वय कमी करायचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरा आता तरूण होणार आहे.

शिवाय एवढ्यातच आपण रिटायर्ड होणार नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मंत्रिमडळाला तरूण चेहरा देणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्यावर आता राहुल गांधींचा मंत्रिमंडळात समावेश होणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे.

close