विद्यार्थिनींसाठीच्या सायकली बाजारात विकल्या

September 6, 2010 11:02 AM0 commentsViews: 2

6 सप्टेंबर

राज्य सरकारकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागातील शालेय मुलींना अल्प दरात सायकल वाटप करण्यात येते. या सायकल वाटपात जुन्नर पंचायत समितीत, मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

ज्या सायकली मोफत वाटायच्या होत्या, या सायकल संबंधित क्लार्कने प्रत्येकी 800 ते 2000 रुपये घेऊन, विकल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी गावकर्‍यांनी, ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले.

close