शब-ए-कद्र उत्साहात साजरी

September 6, 2010 11:56 AM0 commentsViews: 17

6 सप्टेंबर

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात येणारी धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि पवित्र मानली जाणारी शब-ए-कद्र आज साजरी केली जात आहे.

आजच्या रात्री मुस्लिम बांधव विविध मस्जिदीमध्ये नमाज अदा करुन विशेष प्रार्थना करतात. पवित्र ईश्वरीय ग्रंथ कुराण शरीफ प्रेषित मोहमंद पैगंबर यांच्याकडे आजच्या दिवशी सोपवण्यात आला होता.

त्यामुळे रात्रभर जागरण करुन मुस्लिम बांधव सर्वत्र कुराण शरीफचे पठण करतात. दान धर्माला या महिन्यात मोठे महत्व असल्याने मुस्लिम बांधव दान करतात. शिवाय मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.

close