मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुण्यातून दोन माजी लष्करी अधिका-यांना अटक

October 25, 2008 5:03 PM0 commentsViews: 2

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या अटकेनंतर आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागले आहेत. मुंबई पोलिसांच्या एटीएसनं अटकसत्र सुरू केलंय. या हिंदू अतिरेक्यांना बॉम्बस्फोटासाठी मदत करणा-याभोवती फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. एटीएसची पथकं भोपाळ, इंदौर आणि सुरतला रवाना झाली आहेत. पुण्यातून दोन माजी लष्करी अधिका-यांना एटीएसनं ताब्यात घेतलंय. बॉम्ब बनवण्यासाठी या अधिका-यांनी मदत केल्याचा संशय आहे.दोन वर्षापूर्वी साध्वी बनलेली प्रिया त्यापूर्वी तब्बल सतरा वर्ष आरएसएसची विद्यार्थी शाखा असलेल्या एबीव्हीपीची कार्यकर्ती होती. तिला सुरतमधील पूना कुंभारिया या भागातून अटक झाली. एटीएसनं लष्कराच्या दोन निवृत्त अधिका-यांनाही पुण्यातून ताब्यात घेतलंय. याशिवाय भोपाळ आणि नाशिकमध्येही एटीएसनं काही लोकांची चौकशी सुरू केली आहे.

close