डोपिंगमधील दोषी कुस्तीपटूंना वगळले

September 6, 2010 12:06 PM0 commentsViews:

6 सप्टेंबर

डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या चार कुस्तीपटूंना कॉमनवेल्थ टीममधून वगळण्यात आले आहे. दुसर्‍या उत्तेजक चाचणीतही हे खेळाडू दोषी आढळले.

त्यामुळे त्यांच्यावर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या खेळाडूंमध्ये सगळयात मोठे नाव आहे, ते राजीव तोमरचे. 120 किलो वजनी गटात खेळणारा तोमर बीजिंग ऑलिम्पकमध्येही सहभागी झाला होता. आणि अगदी काही महिन्यांपूर्वी त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तोमर खेरीज सुमीत, मौसम खत्री आणि गुरशरणप्रीत कौर या खेळाडूंनाही टीममधून वगळण्यात आले आहे. या खेळाडूंऐवजी चार बदली खेळाडूंची निवडही जाहीर करण्यात आली आहे.

close