…तर जयंत पाटलांना मंत्रिमंडळातून काढा

September 6, 2010 12:43 PM0 commentsViews: 8

6 सप्टेंबर

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील चांगलेच वैतागले आहेत.

होय, आम्हाला जयंत पाटलांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी असे असेल, तर शरद पवारांनी पाटलांना मंत्रिमंडळातून काढून दाखवावे, अशी टीकाही केली.

close