साखरेच्या भाववाढीसाठी तोडफोड

September 6, 2010 2:12 PM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

साखरेला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता जोर पकडू लागले आहे.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर इथे पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मवीर साखर कारखान्यापुढे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याच्या गाड्यांची तोडफोड केली.

यात दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. साखरेची उचल करण्यासाठी आलेले ट्रकही कार्यकर्त्यांनी परतून लावले आहेत.

close