बलात्काराच्या तपासणीच्या अटी बदलण्याची मागणी

September 6, 2010 3:34 PM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

भारतात बलात्कार झालेल्या महिलांची तपासणी करताना ज्या जाचक अटी लावल्या जातात, त्या बदलण्यात याव्यात यासाठी ह्युमन राईट वॉच या संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी जी सिंगर टेस्ट भारतात केली जाते, ती अत्यंत जाचक असून असंवेदनशीलरित्या याची चाचणी केली जाते. यामध्ये ही टेस्ट रद्द करावी, अशी मागणी या संस्थेने केली आहे.

त्याचबरोबर पोलिसांच्या अहवालाशिवाय बलात्कार झाला आहे की नाही, याची टेस्ट केली जात नाही. त्यामुळे बराच वेळ वाया जातो. यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता असते.

तरीही पोलिसांच्या अहवालाची वाट न बघता पीडित महिलेची चाचणी ताबडतोब करण्यात यावी, अशीही मागणी या संस्थेच्या वतीने करण्यात आली. त्याचसोबत या सर्व यंत्रणांमध्ये संवेदनशीलता असावी,अशी मागणी या संस्थेने केली आहे.

close